मार्कडी ते आंबेडकर चौक रस्ता नेमका कसा होणार? नगरसेवक शशिकांत मोदी यांचा सवाल

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.

चिपळूण :- शहरातील मार्कडी चौक ते आंबेडकर चौक या दरम्याने असणारा रोड पूर्णत: खराब, खड्डेमय झाला आहे. सदर रस्ता हा गेल्यावर्षी चिपळूण नगरपालिकेच्या ताब्यात आला असून तो व्यवस्थित व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तसेच शालोम गल्लीतील रोडही सुस्थितीत व्हावा असे मागणीचे निवेदन नगरसेवक शशिकांत मोदी यांनी नगरपालिकेत दिले आहे. चिपळूण शहरातील उपनगरातील कराड रोड हा गेल्यावर्षी नगरपालिकेच्या ताब्यात आला. सदर रोड ताब्यात आल्यानंतर १५ मीटर रुंद करण्याचा प्रस्ताव काही नगरसेवकांनी मांडला परंतु नगरपालिकेने तांत्रिक मंजुरीसाठी पाठविलेला रोड हा सध्या अस्तित्वात असणारच आहे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर सदर रस्त्याचे काम कश्याप्रकारे चालू होणार आणि या रस्त्याचे काम चालून झाल्यास पुढील वर्षीही नागरिकांना खड्ड्यातूनच जावे लागणार की, काय अशी शंका निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत सदर रस्त्याचे काम सुरु होणे अपेक्षित आहे. अन्यथा आंदोलन करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. सध्या हा रस्ता खूपच खराब झाला असून ज्येष्ठ नागरिक या रस्त्यावरून प्रवास करण्याचे टाळत आहेत. तसेच परशुरामनगरमधील हॉटेल शालोमकडे जाणारही गल्लीतील रोड अतिशय खराब झाला असून सदर रस्ता सिमेंट काँक्रीटचा करू नये, असे मत नगरसेवक शशिकांत मोदी यांनी तेव्हा मांडले होते. कारण पावसाचे पाणी जाण्यासाठी तेथे गटार अस्तित्वात नाही. त्यावेळच्या नगरपालिकेचे अभियंता श्री. कांबळे यांनी ५ वर्षाची रस्त्याची गॅरेंटी दिली होती. मात्र सदर रस्ता २ वर्ष्यानंतर खड्डेमय झाला आहे. याचाही नवीन प्रस्ताव तयार असून नगरपरिषदेने त्याला मंजुरी द्यावी अशी मागणीही नगरसेवक शशिकांत मोदी यांनी केली आहे .

*दखल न्यूज भारत*