सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा स्वस्तदरात भाजी विक्री करणार भाजी मंडई विषयात राजकारण करणार्यांना घरी बसवणार सुधीर शिंदे यांची भीष्म गर्जना पत्रकार परिषदमध्ये घेतला विरोधकांचा समाचार

160

 

प्रतिनिधी / ओंकार रेळेकर

चिपळूण : चिपळूण मधील जनतेला परवडेल अशा घाऊक दरातच आपण किरकोळ भाजी उपलब्ध करून देणार आहोत ,भाजी मंडई विषयात आपल्याशी राजकारण करणाऱ्या सर्वांनाच घरात बसविणार अशी भीष्म गर्जना नगरसेवक सुधीर शिंदे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली, चिपळूण नगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक चिपळूण मधील प्रसिद्ध भाजी व्यापारी सुधीर शिंदे यांनी शहरातील गुहागर बायपास रोड येथील मथुरा कॉम्प्लेक्समध्ये निसर्ग संपन्न वातावरणात पांडव लेणी समोर भव्य असा भाजी व्यवसाय नुकताच सुरू केला आहे ,विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या शेतमाल आम्ही नियमित येथे थेट विक्रीसाठी उपलब्ध करत असल्यामुळे ग्राहकांना ताजी भाजी मिळते आमच्याकडे येणाऱ्या ग्राहकाचे समाधान हीच जनतेची सेवा आहे, गुहागर ,चिपळूण,खेड मधील छोटे मोठे भाजी व्यावसायिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे लवकरच चिपळूण मधील दुसरी भाजी मंडई म्हणून उदयास येईल अशी माहिती शिंदे यांनी दिली,पुढे काही दिवसात सर्व प्रकारची भाजी दहा ते वीस रुपये दरात ग्राहकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे ,असे शिंदे म्हणाले,
राजकारणात वावरत असताना माजी आमदार रमेशभाई कदम यांचा आदर्श घेण्या सारखा आहे,

दखल न्यूज भारत