कोकर्डा पुनर्वसनमधील नागरिकांची भर पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकती ,प्राधिकरणाचे दुर्लक्ष, आठवडतातून दोनच दिवस पाणी पुरवठा,बिल भरमसाठ

119

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
कोकर्डा येथील पुनर्वसनमधिल नागरिकांना म जि प्राधिकरणद्वारे होत असलेला पाणी पुरवठा हा आठवड्यातुन दोन दिवस होत असल्याने भर पावसात पुनर्वसनमधिल नागरिकांची भटकंती होत असून नागरिकांना प्राधिकरण बिल मात्र भरमसाठ देत आहे
कोकर्डा पुनर्वसनमध्ये अंदाजे 200 च्या वर कुटुंबे वास्तव्यास आहेत तेथील नागरिकांना पाणी पुरवठा हा महाराष्ट्र जिवन प्राधिकरणमार्फत केल्या जातो सर्वत्र एक दिवसाआड केला जाणारा पाणी पुरवठा केला जातो मात्र पुनर्वसनमधिल नागरिकांना तिन दिवसाआड म्हणजे आठवड्यातुन दोनच दिवस पाणी पुरवठा केला जातो त्यामूळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत शहानुर धरणात पाणी साठा असूनही केवळ येथील नागरिकांना पाणी पुरवठा कमी का?असा प्रश्न निर्माण झाला आहे
*** पाणी हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने पुनर्वसनमधिल नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा हक्क हिरावून घेणे कितपत योग्य आहे केवळ कोकर्डा पुनर्वसनमध्येच पाणी पुरवठा कमी केल्या जातो असे येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे पाणी कमी आणि पाण्याचे बिल मात्र भरमसाठ हा दुजाभाव प्राधिकरण करीत असल्याची ओरड नागरिकांची आहे
काहींना तर प्लॉट विकत घेतल्यापासून नळाच्या पाण्याचे बिल येत आहे
येथे राहणारा वर्ग हा शेतमजूर व इतर काम करणारा आहे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अश्या नागरिकांना पाणी कमी व बिल मात्र जास्त हा येथील नागरिकांवर अन्याय नाही काय?असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे
—————————————-
हँड पंपही बंद आहे
येथील पुनर्वसनमध्ये हँड पंप(हापशी)आहे पण तोही बंद अवस्थेत आहे भर पावासाळ्यात महिला व आबालवृद्धांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे याकडे स्थानिक प्रशासन व शासन तसेच प्राधिकरण विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा नागरिक आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे