पोलीस व आरोग्य प्रशासनास सहकार्य करण्याचे मुंडीकोटा सरपंच तलाठयाचे नागरिकांना आवाहन

126

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे

तिरोडा : मुंडीकोटा हे कंटेन्मेंट झोन म्हणून तयार झाले आहे. यास कारणीभूत गावचे सरपंच, तलाठी, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग असे कोणी नाहीत. गाव कंटेन्मेंट झोन मुक्त करा अश्या मागण्या सरपंच, तलाठी यांना सतत येत आहेत.

मुंडीकोटा हे गाव कोविड कंटेन्मेंट होणे हे गावात निघणारे कोविड बाधीत रुग्ण आहेत. गावातील व्यापारी वर्ग कोविड बाधीत झाले नसते तर कदाचित मुंडीकोटा गावास कंटेन्मेंट झोन तयार झाले नसते. अशी भावना सरपंच व तलाठी यांनी व्यक्त केली.

येथील जनतेच्या आरोग्याचे दृष्टीने व हिताचे दृष्टीने आपले प्रशासन कटिबद्ध असल्याने तिरोडाचे उपविभागीय अधिकारी यांनी मुंडीकोटा हे अख्खे गाव कंटेन्मेंट झोन घोषित केले आहे.
जनतेला सर्व सोयी,सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने सज्जता दाखविले आहेे. नागरिकांना सोय व्हावी म्हणूच ईपासची सुविधा देण्यात आली आहे. जनता देखील यास सहकार्य करीत आहे. अशा कठीण समयी येथील व्यापारी वर्गाने सहनशील बनून गावावर ओढवलेली कोविड आपत्ती संपविण्यासाठी अजून मात्र १२ दिवस मुंडीकोटा येथील व्यापारी व नागरिकांनी आरोग्य व हिताचे दृष्टीने गाव प्रशासन, तालुका प्राशन, पोलीस प्रशासनास कंटेन्मेंट झोनचे पूर्ण २८ दिवस सहकार्य करावे.

आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन डोळ्यात तेल ओतून, प्राण पणाला लावून कोविड आपत्तीसी लढत आहेत.

अश्या बिकट कोविड-१९ आपत्तीच्या क्षणाला मुंडीकोटा हे गाव एक कोरोना योद्धा गावाचे यादीत नाव समावेश करण्यास सर्वतोपरी पूर्वीप्रमाणे एक होऊन मदत करावी. दंडात्मक कार्यवाही करणे हे कोविड रोखथांब होऊ शकत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाहिस सामोरे जावे लागले आहे. तेंव्हा व्यापारी आणि जनतेने यथायोग्य सहकार्य करण्याचे आवाहन मुंडीकोटा सरपंच कमलेश आथिलकर व एम.टी. मलेवार तलाठी यांचे वतीने करण्यात आले आहे.