उपविभागीय अधिकारी धानोरा यांचे वाहन चीखलात फसते तेव्हा…

108

धानोरा/भाविकदास करमनकर

सव्वा महिन्याच्या प्रतिक्षेनंतर धानोरा ला कोरचि येथिल उपविभागिय अधिकारि श्रि धार्मिक यांच्याकडे हे पद सोपविण्यात आले पदभार हाति घेताच त्यांनी धानोरा तालुक्यातील मुंगनेर येथिल संरक्षण भिंतीचे बांधकामास सोमवारला भेट देण्यास आपल्याच सहकार्या सोबत निघाले धानोरा मुंगनेर पेंढरी या मार्गावर जात असताना रस्त्यावर झाड पडल्याने वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने काढत असताना वाहन दलदलीमध्ये फसले फसललेे वाहन तिथेच ठेवून बाईकवर पाच किलोमीटरचा प्रवास केला व तिथेच न थांबता पाऊस सुरु असतांनाहि येनगाव ला चार किलोमिटरचा प्रवास पायदळ केला जि प शाळेच्या एक खोलि वर्ग शाळा बांधकामास भेट देऊन लवकर पुर्ण करण्याच्या सबंधितांना सुचना दिल्या व परत मुंगनेर येथे वापस पायदळ आले असे आठ किलोमिटरचा प्रवास पायदळ केला व फसलेले वाहन ट्रक्टरच्या मदतिने काढले ग्रामिण भागातील रस्ते कसे असतात याचि प्रचिति खुद्द धानोरा येथील उपविभागिय अधिकारी यांनि अनुभवला