खळबळजनक बातमी; भानेगाव खापरखेडा येथील कोरोनाबाधित ठेकेदाराचा म्रृत्यु

0
174

 

सुनील उत्तमराव साळवे
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

भानेगाव-खापरखेडा / नागपुर: २० आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा सर्कल मध्ये असणाऱ्या भानेगाव खापरखेडा येथे काल रात्री १ वाजता च्या सुमारास कोरोनाबाधित ठेकेदार यांचा म्रृत्यु झाला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार ह्या ठेकेदारास मागील काही दिवसांपासून ताप होता.. मागील काही दिवसांपासून आरोग्य कर्मचारी, आंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी त्यांच्या घरी जाऊन कोणी बिमार आहे का? कोणाला सर्दी खोकला, ताप वगैरे आहे का? अशी विचारणा केली असता फक्तं निमोनिया असल्याचे घरचे लोक सांगायचे व आपला खाजगीत ईलाज करायचे. मात्र काल या ठेकेदाराची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याला लता मंगेशकर हाँस्पिटल डिगडोह येथे उपचारासाठी भर्ती केले असता डॉक्टरांनी त्याची कोव्हीड टेस्ट करण्यासाठी मेडिकल मध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. काल रात्री दीड वाजताच्या सुमारास या ठेकेदाराचा मेडिकल हाँस्पिटल नागपुर येथे दुर्दैवी म्रृत्यु झाला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
भानेगाव च्या कोरोनाबाधित ठेकेदार यांच्या म्रृत्यु मुळे संपूर्ण भानेगाव खापरखेडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सौ. अरुणाताई शिंदे सभापती पं. स. सावनेर , प.स.सावनेर रविंद्र चिखले सरपंच ग्रा.प.भानेगाव, अरविंद मेश्राम आरोग्य सेवक, लता बर्वे, संगीता तिड़के आशा वर्कर , रोशन मगघटे, मनोज मारबते, तुर्शिराम खरोले, शिदार्थ पांडे ग्रा.प.कर्मचारी. आदी कोरोनाबाधित पेशंट च्या घरी पोहोचून तेथील कुटुंबियांची चौकशी करीत त्यांच्या कुटुंबातील एकुण १४ जणांना चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड टेस्ट करिता पाठविण्याचा निर्णय घेतला. या कोरोनाबाधित ठेकेदाराचे घरी सेनिटायजर फवारणी ग्रा. पं. भानेगाव च्या वतीने फवारणी करण्यात आली.