डोमा गावातील महिलांना जीवे मारण्याची धमकी देत अश्लील शब्दात शिवीगाळ. — महिलांनी नेला शंकरपूर पोलीस चौकीत मोर्चा.तक्रार दाखल.. — आरोपींना अभय दिल्यास प्रकरण गंभीर होणार!बेजबाबदार आरोपींना तात्काळ अटक कायदेशीर मागणी.

0
201

शुभम पारखी
चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेले एक छोटंसं गाव डोमा.या गावातंर्गत वीरांगना मुक्ताई चे देवस्थान व धबधबा हे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांच्या परिचित असलेले एक पर्यटन स्थळ आहे.अशा या गावात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.
परन्तु काही विपरित समाजकंटक विचारांची लोक डोमा गावातील,समाजा – समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम करीत असल्याचे समोर आले आहे.
दिनांक १९/०८/२०२० पोळा सणाच्या पाडव्याला १२:३० वाजताच्या सुमारास धनश्याम चंद्रभान मुन,तुळशिराम रामाजी दोडके व देवानंद पाडूरग मालके हे तिधे दारू पिवून मुख्य चौका मध्ये आले व बौद्ध समाजीतील सर्व महिलाना उद्देशून,खालच्या पातळीच्या भाषेचा वापर करून अश्लील शब्दात शिवीगाळ करणे सुरु केली.अश्लिल शब्दातील शिविगाळ सहन न झाल्यामुळे,सौ.वनिता गौतम वाघमारे व सौ.भावीका निलकंठ मून व इतर समाजातील महिलानी या तिघांना,तुम्ही कशाला महिलांना अश्लील शिवीगाळ करत आहात असे हटकले?.
मात्र,आरोपींनी महिलांच्या हटकण्याला महत्त्व न देता परत सदर तिघांनी,महिलाना बेताल अश्लील शिवीगाळ केली व जास्त नखरे केल्या तर तुम्हाला जीवानिशी मारून टाकू असी धमकी देली.
तद्वतच आमचे कोण काय वाकळ करते,ते आम्ही पाहू?अशा शब्दामध्ये महिलाना दमदाटी दिली.हे दारुडे महिलांना खुन करण्याची धमंकी व अश्लील शब्दात बोलण्याची हिंमत कोणामुळे करतात?कोण यांचा वाली आहे?हा वाली समाजासमाजात तेढ निर्माण करण्यासाठी काम करतो काय?यांच्या वाल्याला मायबहिणी नाहीत काय?असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
झालेल्या घटनेच्या विरोधात डोमा गावातील सर्व बौद्ध व ईतर समाजातील महिलांनी या तिघा विरूद्ध शकरपूर पोलीस चौकीत तक्रार नोंदवली आहे.आरोपींवर योग्य कलमातंर्गत गुन्हा दाखल करुन,आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी,अशी मागणी तक्रारकर्त्या महिलांची आहे.