अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याच्या जिवाभावाचा मूक असलेला सोबती म्हणजे बैल या बैलाच्या उत्सवाचा सण पोळा मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे या सणावर विरजण पडले
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पथ्रोट येथे 100 वर्षांपासूनची असलेली परंपरा यावर्षी प्रथमच खंडित झाली आहे येथे पोळ्याच्या पाडव्याला भरणारी द्वारकेच्या बैलाची यात्रा भरली नसल्याने पथ्रोटसह परिसरातील शेतकरीवर्गात निराशा पसरली
पथ्रोट येथील गोविंदराव जयराम गोरडे, श्रावण लामखाडे, बंडाजी रसे, वामनराव गोरले या दिवंगत चौकडीने 100 वर्षांपूर्वी बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत पोळा सणाच्या पाडव्याला आपल्या घरच्या बैलास आकर्षकपणे सजवून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू केली बैलास शिंदीच्या पानापासून आकर्षक बाशिंग तयार करुन बैलाच्या शिंगोटीवर बांधून त्याची त्याची विधिवत पुजा करुन गावच्या मारुतीचे दर्शन करुन बैलांना गावात फिरवून झेंडाचौकातील द्वारका बैल उत्सव समितीत नेले जाते त्यानंतर ग्रामदैवत जयसिंग महाराज यांच्या मंदिरात नेऊन पूजन करुन घरी नेले जाते
*** आकर्षक सजावट व बाशिंग असलेल्या बैलजोडीला मंडळातर्फे प्रोत्साहनपर बक्षीस देऊन आदर सत्कार केल्या जातो याची तयारी 15 दिवस आधीपासून करण्यात येते युवापिढी जुन्या जाणत्या वृद्धांच्या मार्गदर्शनात शिंदीच्या कोवळ्या पानापासून आकर्षक बाशिंग तयार करते पथ्रोटला पूर्वी 20ते 22द्वारकेचे बैल निघत असत सध्या माळीपुरा, जयसिंगपुरा, गोरलेपुरा, तांबटकारपुरा, तेलंगखडी, रामपूर बु येथील मानाचे बैल निघत असतात यात्रा उत्सव समितीत योगेश दुबे, जगदेव सावळे, पंजाब घटाळे, साहेबराव डवरे, आशिष सहारे, मुरारी अग्रवाल, रामेश्वर काकड, हि मंडळी सहभागी आहेत जि प सदस्य वासंती मंगरोळे सुधिर रसे, अतुल वाढ, विनोद खलोकार,हि मंडळी आर्थिक सहकार्य करीत असून जुन्या पुरातन परंपरेला कायम राखण्यास प्रोत्साहन दिल्या जाते मात्र यंदा कोरोना महामारीमुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यात्रेसह बैलाची मिरवणूज रद्द झाली असल्याने या सोहळ्यावर विरजण पडले आहे