आ.मुझफ्फर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भुवन,रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष सन्मानिय मा. आ.मुझफ्फर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भुवन,रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.तदप्रसंगी बोलताना हुसेन साहेबांनी नुकत्याच येवून गेलेल्या चक्रीवादळ मध्ये झालेल्या नुकसानाी कुटुंबांना जर काही मदत मिळाली नसेल तर त्याची नावे निवेदन मधून द्या ती यादी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे देतो ,तसेच शासकीय कमेटी याबाबत काही सूचना केल्या तसेच पुढील महिन्यात तालुकास्तरीय दोरा करणार असल्याचे सूचित केले.कार्यकर्त्यांनी मिळून काम करून जिल्ह्यामध्ये पुन्हा काँग्रेसचे आमदार व खासदार निवडून आणूया असे आव्हाहन केले. तदप्रसंगि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले ,माजी जिल्हाध्यक्ष सुजित झिमन, जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव जाधव ,जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी ,जिल्हा चिटणीस संतोष शिर्के,प्रदेश महिला चिटणीस रुपाली ताई सावंत,महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी आगाशे,युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस शिल्पा कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष स्नेहा पिलांकर, महिला तालुकाध्यक्ष अजमेरा शेख,शहर अध्यक्ष रीजवाना शेख,जिल्हा चिटणीस बंडू सावंत,जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर, कपिल नागवेकर ,संगमेश्वर तालुका अध्यक्ष दत्ता परकर,लांजा तालुका अध्यक्ष नुरुद्दिन सय्यद,खेड तालुका अध्यक्ष गौस खतीब,कैस मालगुंडकर,गजानन पिलंकर,निसार बोरकर,रियाज ठाकूर,राजेंद्र मांडवकर,यशवंत बाणे, दिलीप बेलोसे अनिल सदरे इत्यादी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*