आलेले भरमसाठ बील कमी करावे अशी खेड युवासेनेकडून पत्राद्वारे मागणी

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

खेड : विद्युत महामंडळ तर्फे देण्यात आलेल्या वीज बिलांमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत तसेच चार महिन्याचे वीज बिल एकत्र आल्यामुळे नागरिकांना त्वरित भरणे कठीण जात आहे आणि करोना या महामारी मुळे जनतेला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे जनतेला वाढीव मुदत वीज बिल भरण्यासाठी देण्यात यावी ज्या बिलांमध्ये त्रुटी आहेत त्या बिलांमध्ये सुधारणा करावी तसेच जनतेला आलेले भरमसाठ बील कमी करावे अशी विनंती पत्राद्वारे युवासेनेकडून युवासेना जिल्हाधिकारी श्री अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता खेड यांना करण्यात आली. सदर वेळी युवासेना तालुका सचिव राकेश सागवेकर, तालुका आयटी सेल अधिकारी दर्शन महाजन, उपतालुका अधिकारी वाहिद ममतुले , विभाग समन्वयक श्री स्वप्नील सुर्वे , युवासेना शाखा अधिकारी श्री सचिन शिंदे , श्री संजोग मोहिते तसेच युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*