आज पासून राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु ई पासची आवश्यकता नाही; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

127

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

मुंबई:- २३ मार्चपासून बंद ठेवण्यात आलेली एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता उद्या २० ऑगस्टपासून राज्यात एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. याकरिता ई पासची आवश्यकता नसल्यामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटीची आंतरजिल्हा ( Interdistrict ) बस सेवा २० ऑगस्ट २०२० पासून सुरू करण्यात येत आहे. यामध्ये साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील. एसटी प्रवासाला ई-पास ची गरज नाही. एसटीने कोणतेही ज्यादा दर आकारले जाणार नाहीत.
गणेशोत्सवासाठी नागरिकांना प्रवास करता यावा याकरिता देखील एसटीची वाहतूक सुरु करण्याची मागणी आहे. त्यानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळाला आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी दिली आहे. परंतु ही वाहतूक अंशत: असल्याचे समजते. तसेच टप्प्याटप्प्याने ही वाहतूक वाढविण्यात येणार आहे.

दखल न्यूज भारत