पोळ्याच्या पाडव्याला सिल्लेवाडा येथे मर्डर

0
117

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

सिल्लेवाडा-खापरखेडा /नागपुर : २० आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील खापरखेडा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सिल्लेवाडा येथे काल सायंकाळी पाच वाजता आरोपी सिद्धनाथ यादव आणि अमरनाथ यादव या दोन भावांनी मिळून लाली हसन खान आणि जाहिद हसन खान या दोन भावांना लोखंडी पाईप ने मारहाण केली आणि दोघेही फरार झाले.या घटनेत लाली खान नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान कामठी येथे मृत्यू झाला तर त्याचा भाऊ जाहिद वर उपचार सुरू आहे.
ही घटना सिल्लेवाडा येथील वार्ड क्र. ४ येथे आरोपी सिद्धेश्वर याच्या घरा समोर घडली. मिळालेल्या माहिती नुसार मजुरीचे पैसे घेऊन सिद्धेश्वर घरी जात होता दरम्यान लाली ने त्याचा जवळचे १६०० रुपये हिसकावून घेतले आणि त्याचा गालावर चोप देऊन निघून गेला. सिद्धेश्वर घरी गेला त्याचा मागे लाली व त्याचा भाऊ जाहिद दोघेही त्याचा घरी येऊन मारपीट सुरू केले हे बघून अमरनाथ तेथे आला सिद्धेश्वर याने लोखंडी पाईप ने मारून लाली व जाहिद ला गंभीर जखमी केले. घटना स्थळावरून लाली व जाहिद ला त्याचा मित्रांनी उचलून आशा हॉस्पिटल कामठी येथे नेले. घटने ची माहिती मिळाल्यावर घटनास्थळावर खापरखेडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण ची टीम पोहचली. स्थानिक गुन्हे शाखेचे विरेंद्र नरड, खापरखेडा पोलीस स्टेशन चे नितेश पिपरोदे आणि नुमान शेख या तिघांनी मिळून गुप्त माहिती च्या आधारावर अंकित यादव यांच्या घरून सिद्धेश्वर आणि अमरनाथ याना ताब्यात घेतले. पोलिसांनी लोखंडी पाईप जप्त केला.
घटनास्थळावर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट दिली. ठसे तज्ञ चमू ही पोहचला आहे. दोन्ही आरोपीस कलम ३०२, ३४ अंतर्गत अटक केली.