गोरक्षण मध्ये पोळ्यानिमित्त युवकांनी राबविला सेवा उपक्रम

119

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

स्थानिक दर्यापूर मार्गावरील गोरक्षण मध्ये युवकांनी पोळा निमित्त आगळावेगळा सेवा उपक्रम राबविला. यावेळी युवकांनी पहाटेच गोरक्षण गाठले तेथे जवळपास वीस ते पंचवीस बैलांना अंघोळ घालण्यात आली तसेच रंगरंगोटी करण्यात आली. बैलांचे पूजन करून ठोंबरा भरविण्यात आला. वर्षभर शेतक-यांच्या बरोबरीने शेतात राबणाऱ्या ऋषभ राजा च्या ऋणातून उतराई होण्यासाठी युवकांनी सेवा उपक्रमातून प्रयत्न केला. याकरिता गौ सेवक अक्षय तेल्हारकर, मनिष इटनारे, प्रथमेश कांबे, मयुर डोंगरे, शंतनू ढवळी, अंकुश गावंडे व समस्त गौ सेवा कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. उपक्रमासाठी गौप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले.
दुपारी भाजप नेते राजुभाऊ नागमते व काही गौ सेवकांनी गोरक्षण मधील बैलांना नैवेद्य दाखविला तसेच पूजन केले.