संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु, संगणक केंद्र चालकांनी मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार

0
123

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
कोरोना संकटामुळे बंद असलेले संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश आले असून संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे संगणक प्रशिक्षण केंद्राच्या केंद्र चालकांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेतली असून त्यांचे आभार मानले आहे.
कोरोना परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून सर्व अधिकृत अध्ययन केंद्रे बंद ठेवण्यात आले होते. परिणामी संगणक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. हि बाब लक्षात घेता संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहे. याचाच भाग म्हणून संगणक प्रशिक्षण केंद्र हि शासनाच्या वतीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिणामी हे केंद्र बंद असल्याने शासकीय स्तरावर विविध पदांच्या भरती प्रक्रियेत ऑनलाईन अर्ज कारण्यार्यांना अडचण होत होती. इच्छुक उमेदवारांना एम.एस.सी.आय.टी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून प्रमाणपत्र मिळविणेही कठीण झाले होते. तसेच सततच्या बंदमुळे केंद्र चालकही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला होता. या सर्व परिस्थीतीचा विचार करून सर्व संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात यावेत अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. सदर मागणी संदर्भात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते. दरम्यान सदर मागणीची दखल घेण्यात आली असून हे सर्व संगणक केंद्र सुरु करण्यात आले आहे. हे केंद्र सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संस्थने केलेल्या मागणी नंतर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे संगणक प्रशिक्षण केंद्र चालकांनी स्वागत केले असून आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहे. यावेळी रमजान खान, नासीर खान, लक्ष्मीकांत कामळे, गणेश धानोरकर, युवराज पवार आदी संस्था चालकांची उपस्थिती होती.