वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे घराची भिंत कोसळली,मजुराचा संसार उघड्यावर,नुकसान भरपाईची मागणी

0
69

 

वणी : परशुराम पोटे

तालुक्यातील कोलार(पिंपरी) येथे वेकोलीच्या ब्लास्टिंगमुळे एका मजुराच्या घराची भिंत कोसळली असुन मोठे नुकसान झाले आहे. परिनामी नुकसान भरपाईची मागणी महाव्यवस्थापक कार्यालय भालर तथा तहसिलदार वणी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पैकन शामराव पिदुरकर हे कोलार(पिंपरी)येथिल रहिवाशी असुन ते मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.अशातच दि.११ आँगष्ट रोजी पैकन च्या घराची भिंत अचानक कोसळली.घराची भिंत कोसळण्याचे कारन असे आहेत की, वेकोलीच्या ब्लाँस्टिंगमुळे संपुर्ण घरांना मोठ मोठे तडे गेलेले आहे.परिणामी मंगळवारी घराची भिंत अचानक कोसळली.यामुळे भिंतीसह घरावरिल कवेलु व फाट्यांची मोठी नुकसान झाली.परिणामी पैकन पिदुरकरचा संसार उघड्यावर पडला असल्यामुळे, वेकोलीने पडलेली भिंत उभारुन द्यावी,किंवा झालेले नुकसानिची भरपाई द्यावी.असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.