24 तास नंतर विलगीकरण कक्षातू फरार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मसेली- राजाटोला येथुन पकडला

0
79

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची दि 19ऑगस्ट
येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात विलगीकरणात असलेल्या एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने ता.१७ वसतिगृहातून फरार झाल्याची बातमी पसरताच खडबडून जागे झाले. आरोग्य विभागाने 24 तासा नंतर मसेली जवळी राजाटोला रस्तावर पकडुन गडचिरोली कोविड सेंटरला रूग्णाची रवानगी केली.
९ ऑगस्टला तामिळनाडूहून आलेल्या कैमूल (सावली) येथील एका मजुरास कोरची येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १७ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याचा अहवाल आला. याविषयीची माहिती होताच रात्री भोजन केल्यानंतर त्याने विलगीकरण कक्षातून पलायन केले होते . ता 18 सकाळी रुग्णांना नाश्ता देतेवेळी एक रुग्ण गायब असल्याची बाब लक्षात येताच अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती.
विलगीकरण कक्षात जेवनाची व्यवस्था बरोबर नाही, आंघोळीला पाणी मीळत नाही, नास्ता वेळीच मीळत नाही, विलगीकरण कक्षातील आंतरिक व्यवस्था बरोबर नाही, त्या मुळे पळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.