मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच घोडदरा येथे महिलेची विष प्राषन करुन आत्महत्या

128

 

 

मारेगाव/ रोहन आदेवार

तालुक्यातील घोडदरा येथे एका विवाहित महिलेने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. म्हैसदोडका येथील आत्महत्येची घटना ताजी असतानाच पुन्हा तालुक्यात आत्महत्याची घटना घडली आहे.
वंदना गजानन धनवे (५०) रा.घोडदरा असे मृतक महिलेचे नाव आहे.
सदर महिलेने दि.१९ आँगष्ट्ला दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विष घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबातील व्यक्तिंनी तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. तिच्या पश्चात पती व तीन मुली आहे. ऐन सणासुदीच्या दिवसावर घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.