तान्हा पोळा लॉक डाऊन चे नियम पाळून साजरा

114

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 19 ऑगस्ट
तान्हा पोळा उत्सव समिती, इंदिरा गांधी चौक आरमोरी च्या वतीने गेल्या विस वर्षांपासूनची परंपरा कायम राखत तान्हा पोळा साजरा करण्यात आला.
इंदिरा गांधी चौक आरमोरी येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात तान्हा पोळ्याचा उत्सव साजरा करण्यात येत होता. या दरम्यान नंदि सजावट स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा आयोजित करून उत्कृष्ठ नंदि सजावट व उत्कृष्ठ वेशभूषा यासाठी, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहन पर पुरस्कार आयोजकांकडून दिले जात होते, परंतु यावर्षी कोरोना महामारीचा प्रकोप पाहून जाता परंपरा खंडित होऊ नये यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करीत गर्दी न करता नंदि पुजन करून प्रसाद वितरण करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठित सराफा व्यापारी दिपकजी बेहेरे, केशवराव कुंभारे, डॉ. रमेश कुंभारे, सामाजिक कार्यकर्ते सुनील नंदनवार, सामाजिक कार्यकर्ते पंकज खरवडे, मनिष कोहाडे, गजानन कुंभारे, नरेंद्र कुंभारे, राहुल बेहेरे, माणिक कुंभारे, सुधीर गजपुरे, अभिजीत निखारे, मयुर बेहेरे, संतोष करंडे उपस्थित होते.