कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहित एक अन्य महिला पण कोरोना पाँजिटीव

178

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर:१८ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या कोराडी ग्रा पं हद्दीतील कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे सह एक अन्य महिला पण कोरोना पाँजिटीव निघाल्याचे धक्कादायक खात्रीलायक माहिती पुढे येत आहे.
कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे मागील मार्च महिन्यात च कोराडी पोलिस स्टेशन ला रुजु झाले होते. कोराडी ला ते रुजु होताच कोरोना चा संसर्ग सुरु झाला. त्यावेळी विनाकारणच घराबाहेर फिरणाऱ्या नागरिक, युवक यांना विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण शिक्षा देणारे कोराडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चर्चेत आले होते. कोरोना च्या पार्श्वभूमीवर विविध भागात जाऊन त्यांनी कोव्हीड योद्धा म्हणून चांगले कार्य केले होते.
काल कोराडी नाक्यावरील ओम नगर येथे ४ जणांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे एसिपी कार्यकर्ते व त्यांच्या सहकारी कर्मचारी तसेच महादुला नगरपंचायत चे कर्मचारी यांचे सोबत पंचनामा करण्यासाठी उपस्थित होते. काल सायंकाळपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती असे म्हणतात. काल त्यांना ताप होता. आज सकाळी ते कोराडी पोलिस स्टेशन ला ड्यूटी वर आले होते. त्यांनी आजच राजनगर येथील एका खाजगी लैबला कोव्हीड टेस्ट केली होती असे समजते. त्यानंतर त्यांना ते पाँजिटीव असल्याचा रिपोर्ट येताच त्यांनी कोराडी पोलिसांना कळविले व स्वतः नागपुर येथील काटोल रोड चौकातील त्यांचे घरी होम कोरोंटाईन झाले अशी माहिती मिळाली.उद्या त्यांच्या परिवारातील सदस्यांची कोव्हीड टेस्ट करणार आहेत.

नवी कोराडी वार्ड क्रमांक २ मध्ये एक महिला कोरोना पाँजिटीव

कोराडी ग्रा पं. चे सचिव उत्तम झेलगोंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार कोराडी वार्ड क्रमांक २ मध्ये राहणारी एक ३२ वर्षिय महिला आज कोरोना पाँजिटीव निघाली आहे. तिला दोन दिवसापासून ताप असल्याचे समजते तिने पण आपली खाजगी टेस्ट केली असता ती पाँजिटीव निघाल्याचे समजते. कोराडी ग्रा पं. चे सचिव झेलगोंदे तसेच ग्रा पं कर्मचारी यांनी या महिलेच्या घरी जाऊन सेनिट्राईज केले आणि प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले.