डोक्यावर दारुची बाटली फोडून युवक गंभिर जखमी, वणी-वरोरा बार समोरील घटना

0
86

वणी : परशुराम पोटे

वणी- वरोरा मार्गावरील ऐका बार समोर डोक्यावर दारुची बाटली फोडुन एका युवकाला गंभिर जखमी केल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मंगळवारी रात्री ७ वाजताच्या दरम्यान वणी- वरोरा मार्गावरील ऐका बार समोर मोहन दिलीप मुळे(३१) हा मित्रा सोबत बार मध्ये गेला होता.या दरम्यान तिथे बादशाह ऊफ नंदकिशोर रासेकार(३६) आला व त्याने मोहन सोबत विनाकारण वाद घालुन शिवीगाळ केली व मोहन मुळे याच्या डोक्यावर दारूची बाटली मारून जखमी केले त्या वेळी राकेश नावाचा व्यक्ती वाद सोडविण्याकरिता आला असता त्यास सुध्दा धक्काबुक्की केली.तसेच त्याचा मिञ सौरभ हनुमंते यास सुध्दा मारहाण झाल्याने उपचारासाठी रूग्णालयात भरती केले. या प्रकरणी जखमी चे वडील दिलीप महादेवराव मुळे(५९) रा. जैन लेआऊट वणी,यांच्या फिर्यादी वरून मारहाण करनारा बादशाह ऊर्फ नंदकिशोर रासेकर (३६) याचे विरुद्ध भादंवी ३२६,५०६ अतगंत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.