गजानन अरबट यांना बळीराजा कृतज्ञता पुरस्कार प्रदान

103

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

शेतीच्या सर्व कामासाठी यंत्राचा वापर सुरू झाल्याने आज बैलाचे अस्तित्व कमी झाले.दळणवळणातही अमुलाग्र क्रांती झाली आणि बैलगाडीची जागा मोटारसायकल, ट्रॅक्टर, कारने घेतली त्यामुळे आजच्या काळात बैल जोडी आणि बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना यांत्रिकीकरणाच्या काळातही पारंपरिक बैलजोडीच्या सहाय्याने शेती करणाऱ्या व बैलांना उत्तम खुराक देऊन बैलजोडी जपणाऱ्या शेतकऱ्याला आमदार अमोल मिटकरी यांच्यावतीने कै.रामकृष्णजी मिटकरी स्मृति”बळीराजा कृतज्ञता पुरस्कार” देण्याचा उपक्रम यावर्षी पासून सुरू करण्यात आला असून पहिला पुरस्कार अकोट तालुक्यातील देवर्डा येथील शेतकरी गजानन अरबट यांना बैलपोळ्याला छोटेखानी कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.बळीराजाची प्रतिमा ,सन्मानपत्र देऊन अरबट कुटुंबाचा सन्मान करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.