टाकळी बु.परिसरात पावसाच्या रिपरिपमुळे पिके संकटात

102

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आकोट तालुक्यातील टाकळी बु .परिसरात सततच्या पावसामुळे पिकावर रोगराईचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. टाकळी बु.परिसरात सततच्या पावसामुळे टाकळी बु.,सालखेड, आगासखेड ,लाजरवाडी, पारळा ,नखेगाव, पिलकवाडी या परिसरात पावसामुळे मुग, उडीद पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले .तर वातावरण ढगाळ राहत असल्याने तुर ज्वारी व कपाशी पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकावर रोगराईचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हतबल झाला, आहे पावसामुळे गवताचे प्रमाण वाढल्याने खुरपणीचा खर्चही वाढला आहे. शासनाने या परिसरातील शेतकय्रांना शंभर टक्के अनुदानावर कीटकनाशक पुरवावी अशी मागणी शेतकय्रांकडुन होत आहे.

चौकट

सर्व पिकात साचलेले अतिरिक्त पावसाचे पाणी सय्रा काढुन त्वरित शेता बाहेर काढावे तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किड व रोगराई येण्याची शक्यता आहे. तरी शेतकय्रांनी आपल्या गावाच्या कुषी सहाय्यक यांचे मार्गदर्शन घेऊन ओषधांची योग्य प्रमाणात फवारणी किट वापरून फवारणी करावी.

सुशांत शिंदे तालुका कुषी अधिकारी आकोट

चौकट

टाकळी बु. परिसरात सततच्या पावसामुळे शेतातील पिकांवर मोठया प्रमाणात रोगराई आल्याने कुषी विभागाने कीटकनाशक पुरवावी व मार्गदर्शन करावे.

रामकृष्ण ना वसु

शेतकरी टाकळी बु.