उपेक्षीत कलाकारांना शासनाच्या विविध योजना मिळवून देणारच – संपर्क प्रमुख रामचंद्र चौगले . कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघातर्फ कलाकारांना मोफत धान्य वाटप .

136

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

काम तर दाम अशा अवस्थेत स्वता:सह आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आणी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकारांवर कोरोना संकटामुळे उपासमारीची वेळ आली आहे . कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर कलाकारांच्या पोटची खळगी भरण्यासाठी त्यांच्याकडे एक छदामही नाही . तरीही शासनाने अशा कलाकारांना बेदखल केले आहे .कलाकरांसाठी काय वाटेल ते करावे लागले तरी चालेल पण कलाकारांना शासनाच्या विविध योजना मिळवून देणारच असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे संपर्क प्रमुख रामचंद्र चौगले यांनी केले .
कोल्हापूर जिल्हा संघाच्या वतीने कोल्हापूरातील कलाकारांना मोफत धान्य वाटप करण्यात आले . या प्रसंगी ते बोलत होते
यावेळी कोल्हापूर शहरातील यादवनगर, पाचगाव व संभाजीनगर येथील २८० कलाकारांना मोफत धान्य संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील, व संपर्कप्रमुख व कलाकार रामचंद्र चौगले यांचे हस्ते वाटप करण्यात आले आहे.
यावेळी विलासराव पाटील म्हणाले की कलाकाराना कार्यक्रम नसलेने ऊपासमारीची वेळ आली आहे तरी त्याना लोककलाकार संघाचा आधारवड असणार आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी रेखा पाटील लोकनाट्य तमाशा मंडळ, कलामेनका लोकनाट्य तमाशा मंडळ, वैशाली संध्या डावाळे लोकनाट्य तमाशा मंडळाचे , नाट्यकलाकार, सांस्क्रूतीकचे कलाकार
पाचगाव, यादवनगर, कळंबा व संभाजीनगर येथील २८० कलाकाराना दहा किलो तांदूळ, दहा किलो गहु व ईतर धान्य वाटप करण्यात आले.
जिल्हा संघाचे ऊपाध्यक्ष शंकर डावाळे, सचीव दत्तात्रय मोरबाळे, सिने अभिनेते विजय दळवी, अभिनेत्री मंगला गुरव, लावणी न्रूत्यांगना मेनका पवार, मेघा पाटील,लता गुरव, रसिका सुतार, विजया डावाळे, भगवान लोहार, बी.जी.सावर्डेकर, पुंडलीक लोहार उपस्थीत होते