कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्यातील दिव्यांग बचत गटांना 15 लाख 96 हजार निधी वितरण

115

 

वाशिम– जिल्ह्यात कोरोना या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषद स्तरावरील जिल्हा अपंग कल्याण निधीमधून जिल्ह्यातील 15 लाख 96 हजार रु. चे निधी वितरण करण्यात आला.जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे आणि समाज कल्याण सभापती वनिता देवरे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही वाशिम जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना 16 लाख 8 हजार रुपयांचे वितरण करण्यात आले होते. याचं धर्तीवर दिव्यांगांना उदर निर्वाहाचे साधन निर्माण करणेसाठी जिल्ह्यातील 168 दिव्यांग बचत गटांचे खात्यात RTGS द्वारे अनुदान वितरीत करण्यात आले आहे अशी माहीती कार्यालयाकडुन प्राप्त झाली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206