केळवदच्या बडग्या — मारबत पंरपरेवर कोरोना चे सावट ५० वर्षात पहील्यादांच विदर्भ प्रख्यात केळवद च्या तान्ह्या पोळ्याला स्थगिती.

 

मंदार बावनकर
केळवद शहर प्रतिनिधि

केळवद-सावनेर/नागपुर

केळवद, दर वर्षि बैल पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी लाकडी नंदयाचा बैल पोळ्यात घेऊन जा गे मारबत च्या घोषणांनी दुमदुमणारे केळवद यावर्षि कोरोना संसर्गजन्य रोगामुळे क्वांरटाईन झाल्याचे पाहवयास मिळेल ,मागील ५० वर्षापासुन येथे सुरु असलेली बडग्या — मारबत पंरपरेला या वर्षि कोरोना रोग प्रतिबंधक कायदयामुळे रद्द झाल्याचे निश्चित झालेले आहे.सार्वजनिक ठिकाणी गर्दि होवू नये तसेच सन उत्सव घरच्या घरीच साजरे करावे असे आदेश असल्याने यावर्षि साजरा होणारा येथिल तान्हा पोळा उत्सवाला स्थगिती मीळाली आहे.
नागपुर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील केळवद येथिल लाकडी नंदी बैलाचा पोळा विर्दभासह लगतच्या मध्यप्रदेशातील छिदंवाडा ,बैतुल जिल्ह्यात प्रसिध्द आहे.बैल पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी बडग्या —मारबत तसेच लाकडी नंदी बैलाचा दिमागदार आणी ऊत्साही पोळा येथे साजरा होत असतो,मोठ—मोठे लाकडी नंदी या पोळ्यातील वैभव तर यासह बडग्या —मारबत याचे दहन करने या पोळ्याची पंरपरा आहे.समाजातील वाईट पंरपरा कुप्रथा, भ्रष्ट्राचार,कुरापती शेजारी देश पाकीस्तान,चीन,आतंकवाद यांचा निषेध यावेळी बडग्या —मारबत यांच्यातुन केला जातो.मागील पन्रास वर्षापासुन सुरु असलेली ही पंरपरा नियमित सुरु आहे.यावेळी गावात येणार्‍या पाहूण्यामुळे गावाला जञेचे स्वरुप आलेले असते.
लाकडी नंदी बैल सजवुन त्यावर मशाली (टेंभे)पेटवण्यात येते,तर गावातील विविध समाजाच्या वतिने बडग्या —मारबत काढत संगितमय वातावरणात येथिल बाजार चौकात आणल्यानतंर या बडग्या —मारबतीचे दहन केले जाते.बडग्या —मारबतीत कर्णकर्कश संगीतात बेधुंद नाचत आनंद लुटणार्‍या तरुनाईला यावर्षि यापासुन मुकावे लागणारआहे.यावेळी राज्य राखीव पोलीस दलासह सावनेर तालुक्यातील सावनेर, केळवद ,खापा ,खापरखेडा या पोलिस स्टेशनचे अतिरीक्त पोलीस तुकड्या तैनात असतात.माञ यावर्षि तान्हा पोळा होणार नसल्याने,पोलीसांची दमछाक ही कमी होणार,तर मध्यप्रदेशातील पाढुर्णा येथिल गोटमार आणी केळवदचा तान्हा पोळा एकाच दिवशी साजरा होत असल्याने,दिवसा पाढुर्णा येथिल गोटमार आणी संध्याकाळी केळवद चा पोळा , अश्या दोन्ही ऊत्साहांना पाहयाला येणार्‍या ऊत्साही नागरीकांच्या आनंदावर विरजन पडले आहे.