नागपुरातील सावनेर विधानसभा मधील सर्रा गावातील शेतकऱ्यांची चिखलमय रस्त्याची व्यथा मंत्री सुनीलबाबु केदार आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची व्यथा दुर करतील काय? सर्रा – कोरमेटा-बिछवा रस्त्याचे निर्माण कार्य कधी सुरु करणार?

399

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

सर्रा- बडेगाव /सावनेर/नागपुर :१८ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा सर्कल मधील सर्रा गटग्रापंचायत मधील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली असुन मागील १० वर्षापासुन सर्रा-कोरमेटा-बिछवा मार्गावर दोन फुट चिखल झाला आहे. पावसाळ्यात या मार्गाने पायी चालता येत नाही. बैलबंडी फसते. या मार्गाचे मागील दीड वर्षांपासून टेंडर निघुनही अद्याप काम न झाल्याने शेतकऱ्यांना दोन फुट गड्ड्यातुन पायपीट करीत आपल्या शेतामध्ये जावे लागते.
आज दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांनी सर्रा या गावी भेट दिली असता तिथे शेतकऱ्यांनी आज पोळ्याच् सणाला आपली दयनीय परिस्थिती व्यक्त केली. पोळ्या सारखा सण आम्हाला साजरा करता येत नाही. शेतात भर पावसाळ्यात चिखल तुडवीत पायपीट करीत खत कसे न्यावे? मालटाल कसा आणावा बैलबंडी चिखलात फसते.
पीडब्ल्यूडी विभागातर्फे मंजुर सर्रा – कोरमेटा-बिछवा या मार्गाचे टेंडर होऊनही या रस्त्याचे निर्माण का होत नाही? या क्षेत्रातील आमदार व विद्यमान मंत्री सुनीलबाबु केदार हे आम्हाला सवतीच्या लेकरावानी का बघतात? आमची दयनीय अवस्था केदारांनी बघावी. या रस्त्याचे टेंडर ज्या ठेकेदाराला मिळाले तो ठेकेदार निकम रस्ता का बनवत नाही? ठेकेदार निकम यांचे विरुध्द आम्ही FIR करावा काय?
शासनदरबारी आमची व्यथा
पोळ्याच्या सणाला मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे ऐकुन घेतील काय? आणि आम्हाला आमच्या शेतात जायला चांगला रोड केव्हा भेटेल? अशा विविध प्रश्नांची मागणी करतांना आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रु येत होते. पोळ्याच्या दिवशी अन्नदाता शेतकरी यांचे डोळ्यात येणारे अश्रु या क्षेत्रातील आमदार व विद्यमान मंत्री सुनीलबाबु केदार हे नक्कीच पुसतील अशी आस लाऊन सावनेर विधानसभा सर्कल मधील सर्रा गटग्रापंचायत चे शेतकरी टक लावून बसले आहेत.