प्रा. सदाशिव उंबरदंड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी पदवी.

112

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी, बाळासाहेब सुतार दिनांक 18

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.सदाशिव उंबरदंड यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डीची पदवी संपादन केली.

अनॅलिटिकल स्टडी ऑफ फायनान्सील परफॉर्मन्स ऑफ इंजिनीरिंग इंडस्ट्रीज इन पुणे डिस्ट्रिक्स या विषयातून त्यांनी पदवी संपादन केली असून बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे चे प्राचार्य डॉ.चंद्रकांत रावळ यांनी मार्गदर्शन केले.

माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सचिव मुकुंद शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

संस्थेच्या उपाध्यक्ष पद्मा भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160