तिरोडा तालुक्यात अतिशय साधे पद्धतीने बैल पोळा सण उत्साहात साजरा

100

 

बिंबिसार शहारे/अतीत डोंगरे

तिरोडा, १८/०८/२०२०:
कोविड-१९ विषानुवर मात करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यात सार्वजनिकपणे पोळा सण करण्यास मनाई हुकूम तामिल केला होता. याचे पालन पोलीस प्रशासनाने आपल्या स्तरावरून गावपातळीवर केले आहे. गावातील तलाठी, सरपंच यांनी गावा गावात मुनियादी देऊन पूर्व सूचना सर्व जनतेला दिल्या होत्या. याचा परिपाक म्हणू गावात सार्वजनिक रित्या कोठेच पोळा भरविण्यात आले नाहीत.
नियमांचे पालन करीत बळी राजाने वर्षभर राबणाऱ्या बैलांचा हिरमुसपणा होऊ दिला नाही. घरीच बैलांची आंघोळ केली. बसिंग सेरले, रंग रंगोटी केली. चौरंग बांधले. झुलाने सजवले. त्याची पूजा अर्चा केली. पाया पडल्या. घरी बनवलेले करंजी,अनारसे,वडे, सुवऱ्या, भजे पंच पक्वणांचे सजविलेले टोपली समोर करून बैलांना भरविले आणि पोळा सण साजरा केला.
तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यासाठी बळीराजा शेतकरी यांचे पोलीस निरीक्षक डमाळे तर तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी समस्त जनतेचे कौतुक,अभिनंदन व्यक्त करीत यापुढे देखील कोविड विषाणूचे रोखथांब करण्यास तालुका प्रशासनास मदत करण्याचे आवाहन केले आहे.