धक्कादायक घटना ; कोराडी ओम नगर मध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांची आत्महत्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट; नागपूर पोलिसांनी माध्यमांशी बोलणे टाळले

432

 

सुनील उत्तमराव साळवे*(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर.

कोराडी / नागपुर :१८ आँगस्ट २०२०
नागपुर शहरातील कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ओम नगर येथील तिवारी चक्की जवळ राहणारे धीरज राणे यांच्या कुटुंबातील एकुण ४ जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
धीरज राणे (वय ४०)हे प्राध्यापक होते तर त्यांच्या पत्नी सुषमा(३५) ह्या डॉक्टर होत्या. आज दुपारी २-३ च्या दरम्यान धीरज राणे सुषमा राणे आणि त्यांची दोन मुले वय १२ वर्षे आणि १० वर्ष यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
डॉ.सुषमा यांनी स्वतःला फाशी लावली तर त्यांचे पती धीरज आणि त्यांची दोन मुले ही बेडवर म्रृत अवस्थेत पडलेले पोलिसांना दिसली. घटनास्थळी एसिपी कार्यकर्ते व कोराडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजिर शेख हे दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन या चौघांचे प्रेत पोस्टमार्टेम करिता मेयो रुग्णालयात पाठवले. या संदर्भात दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांनी राणे कुटुंबियातील ४ जणांच्या आत्महत्या चे कारण विचारले असता त्यांनी यासंबंधी काहीही माहिती देण्यासाठी नकार दिला. जोपर्यंत पोस्टमार्टेम रिपोर्ट येत नाही तोपर्यंत आम्ही अधिकारिक रित्या बयान देऊ शकत नाही असे पोलीस प्रशासनाने सांगितले.

याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला असुन कोराडी पोलिस याप्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत. याप्रकरणी चर्चा सुरू असुन डॉ. सुषमा यांना कोरोना ची लागन तर झाली नसावी? कोरोना च्या भितीमुळे च आपल्या कुटुंबियातील सदस्यांना जहर किंवा एखादे जीवघेणे इंजेक्शन तर दिले नसावे? अशा विविध अफवांना पेव फुटले आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावरच राणे कुटुंबातील ४ जणांच्या आत्महत्येचे गुढ उकलले जाईल हे मात्र नक्की!