समाज सेवा ग्रुप तर्फे देवरी येथे वृक्षारोपण

111

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आज पोळ्याच्या दिवशी बौध्दविहार जवळ आजची परिस्थिति पाहता,पर्यावरण,निसर्ग हे अधिकाधिक सुंदर रहावे म्हणून या उद्देशाने एक झाड एक कार्यकर्ता हा उपक्रम आजचा दिवस पाहता समाज सेवा ग्रुप च्या वतीने देवरी येथे विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले. या झाडाची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्ता यांना देण्यात आली की जेणेकरून भविष्यात झाडांची कमतरता होणार नाही या उद्देशाने आजचा दिवस. आणि आपल्या शेतामध्ये राबून करतो धरतीची सेवा असा हा अपार कष्ट करणारा सर्जाराजा
शेतकऱयांसोबत शेतामध्ये राबनारा सर्जाराजा हा दिवस स्मरणात रहावा म्हणून अश्या प्रकारचा ऊपक्रम समाज सेवा गृपचे अध्यक्ष योगेश लबडे वृक्ष मीत्र रवी ओहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व या ठिकाणी सागर तायडे,संतोष गायकवाड,प्रदीप घ्यारे,अमर ईगंळे, संतोष सावळे निखिल तायडे उमेश सावळे, संदीप वानखेडे गावातील यांचे सहकार्य लाभले.