भंडाराचे नवे जिल्हाधिकारी संदिप कदम रुजू प्रदिपचंद्रन यांनी सोपविला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

0
210

 

प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

भंडारा-(जिमाका) नविन जिल्हाधिकारी संदिप कदम आज रुजू झाले असून त्यांनी एम.जे.प्रदिपचंद्रन यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस.भुवनेश्वरी, सहायक जिल्हाधिकारी मिनल करनवाल,अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे उपस्थित होते.
संदिप कदम मुळचे नाशिकचे असुन हिमाचल कॅडेडसचे 2008 च्या बॅचचे आयएएस आहेत.आयआयटी मधुन अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले कदम यांची हिमाचल प्रदेशच्यामंडी,हमीरपुर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्य केले आहे.भंडारा येण्यापूर्वी राज्य सीईटी सेलचे आयुक्त आणि प्रदेश नियामक प्राधिकरणाचे सचिव होते.हिमाचल प्रदेश येथे असताना बेटी बचाव व स्वच्छता अभियानात त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.हिमाचलच्या धर्मशाळेला स्मार्ट सिटी बनविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.