बार बंद करा, बारमालकाला ग्राम पंचायत प्रशासनाची नोटीस

167

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रा पं अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र 6 मध्ये कविठा ते कांडली रोडवर नागरी वस्तीत उघडण्यात आलेले रेस्टॉरंट व बार हे तात्काळ बंद करा अशी नोटीस कांडली ग्रामपंचायत प्रशासनाकडून बार मालकाला देण्यात आली आहे
परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडली ग्रामपंचायत अंतर्गत वॉर्ड क्र 6 मध्ये कविठा ते कांडली रोडवर नागरी वस्तीत नुकताच रेस्टॉरंट व बार उघडल्याने स्थानिक नागरिकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले असून बारच्या विरोधात ग्रामपंचायत, पोलिस प्रशासन आदींना निवेदन देण्यात आले होते
आता ग्रामपंचायत कडून बार मालकाला बार बंद करण्याची नोटीस देण्यात आलेली आहे संबंधित बार तात्काळ बंद न केल्यास होणाऱ्या कारवाईस बार मालक स्वतः जबाबदार राहील असा इशारा बार मालकास ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आला आहे
—————————————-
ग्रा पं ने बार मालकाला दिलेली नोटीस
—————————————-