रानटी डुकराची शिकार १३ लोकांना पडली महागात. मास विकत घेणारेही अडकले वनकायद्याचे कचाट्यात.

124

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

वन्यजिव संरक्षण अधिनियम धाब्यावर बसवून दिनांक १६/८/२०२० चे दुपारी २-०० वाजताचे दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील चिटकी, येथील चार शिकाऱ्यांनी एफ. डी. सि. एम. चे कंपार्टमेंट क्र. १७२ मध्ये वन्यप्राणी रानटी डुक्कर याची शिकार केली. व त्याची विल्हेवाट सुद्धा लावली. परंतु रात्री ८-३० चे सुमारास वनपरिक्षेत्राचे अधिकारी श्री. अरुण गोंड यांना खबरीद्वारे शिकारीचे गुप्त माहितीनुसार रात्रीच चिटकी गावात जाऊन, तेथील शिकार करणाऱ्या चारही इसमांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता, गावातीलच मास घेणाऱ्या सहा लोकांची तसेच मुरपार (तु.) येथील दोघांची व सरडपार येथील एका इसमाचे नांव सांगितले. तेव्हा १३ ही लोकांना ताब्यात घेऊन, वनपरिक्षेत्र कार्यालय (प्रादेशिक) येथील विश्रामगृहात आनण्यात आल्यानंतर त्यांना रात्रभर ठेवून दिनांक-१७/८/२०२० ला सिंदेवाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधिशांनी त्यांची जामिनावर सुटका केली.
आरोपींमध्ये खालील इसम
*************
१) रामचंद रामभाऊ कामडी २) नितीन अंबादास बोरकर
३) सुधाकर विश्वनाथ चांदेकर
४) आशिष भगवान धुर्वे रा. चिटकी हे चारही शिकारी असून, मास विकत घेणारे,
५) सुनिल तुळशिराम गावडे
६) नंदेश्वर रविंद्र धुर्वे
७) निकेश शामराव पेंदाम
८) नंदू मोतीराम खोब्रागडे
९) अजय अशोक बोरकर
१०) जयपाल तुळशिराम कुळसंगे सर्व रा. चिटकी,
११) सुधीर मोडकू डांगे
१२) इश्वर नारायण गेडाम,
रा. मुरपार ( तु.)
१३) सुरेश श्रीहरी सोनकर
रा. सरडपार यांचा आरोपीत समावेश आहे.
सदरची कारवाई वन्यजिव संरक्षण अधिनियम अंतर्गत करण्यात आली असून, संमंधीत कारवाई उपवनसंरक्षक कुमारी माहेश्वरी बोंगाळे ब्रम्हपूरी वनविभाग यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी श्री. अरुण गोंड यांचे नेतृत्वाखाली श्रेत्रसहाय्यक श्री. रासेकर आणि वनकर्मचारी यांनी केली असल्याचे वनपरिक्षेत्र कार्यालयाद्वारे खात्रीलायक वृत्त आहे.