टाकळी बु. येथे घर कोसळले

0
65

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

गेल्या आठवडाभरापासुन सतधार पाऊस सुरू आहे पावसामुळे आकोट तालुक्यातील टाकळी बु. येथील अनिल भगवान खंडारे यांचे घर १७ ऑगस्ट रोजी कोसळले सुदैवाने यात जीवितहानी झाली. नाही घर कोसळल्याने घरातील अन्नधान्य जीवनाश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे.घरावरील कवेलु फुटुन घराचे सुध्दा नुकसान झाले आहे त्यामुळे घर क्षतिग्रस्त झाल्यामुळे अनिल खंडारे व त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. खंडारे कुटुंबाची परिस्थिती हलाखाची असुन ते अंपग सुध्दा आहेत महसुल विभागाने खंडारे यांच्या घराचा पंचनामा करून त्यांनात्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल श्रीकृष्ण खराबे व गावातील सामाजिक कार्यकर्ते उमेश खंडारे यांनी केले आहे.