मदत व पुनर्वसन मंत्री ना विजय वडेट्टीवार यांनी केले वनमाळी कुटुंबाचे सांत्वन

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक
आरमोरी दि18ऑगस्ट जिल्ह्य़ातील कॉंग्रेस चे जेष्ठ नेते, मनोहर भाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर वनमाळी यांचे 10 ऑगस्टला निधन झाले. होते. रविवारी आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री ना विजय वडेट्टीवार यांनी आरमोरी येथील किशोर वनमाळी यांच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
किशोर वनमाळी याच्या अचानक निधनाने काँग्रेस पक्षाचे फार मोठे नुकसान झाले. स्वर्गीय वामनराव वनमाळी याच्या निधनानंतर जी पोकळी निर्माण झाली होती तीच पोकळी किशोर वनमाळी यांच्या निधनाने झाली. सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कार्य मोठे होते अशा सवेदना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी ना. वडेट्टीवार यांनी श्रध्दांजली वाहिली.
यावेळी किशोर वनमाळी यांची पत्नी सुनीता, मुलगा मयूर, मुलगी पल्लवी ,भाऊ मनोज वनमाळी, अशोक वनमाळी, दीपक वनमाळी, बहिणी गीता कृष्णराव गारोदे , गायत्री महेशराव डाहे यांचे त्यांनी सांत्वन केले.
यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, हरिराम वरखडे, जिवन नाट, परसराम टिकले, जयंत हरडे राजू गारोदे, गणेश फाफट, मनोज अग्रवाल, विश्वास भोवते, संजय लोणारे, मनीषा दोनाडकर, मंगेश वनमाळी, तेजस मडावी, आनंदराव आकरे, साईनाथ अद्दलवार, प्रा. शशीकांत गेडाम, अशोक वाकडे, दत्तू सोमणकर, नामदेव सोरते, मिलिंद खोब्रागडे, विजय सुपारे, रोशनी बैस सह काँग्रेस चे पदाधिकारी नगर सेवक, संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.