मराठा आरक्षणाचे दाखले विद्यार्थ्यांना जागेवर उपलब्ध करून देण्यात यावेत- शिवसेनेची मागणी, रमेश कोंडे जिल्हाप्रमुख शिवसेना पुणे.

113

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागले आहेत व प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अनेक विद्यार्थी वेगवेगळे दाखले मिळण्यासाठी धावपळ करीत आहेत. मराठा जातीचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षण जाहीर झाले आहे. या विद्यार्थ्यांची जातीचा दाखला काढण्यासाठी धावपळ चालू आहे. अशात अनेक लोकांकडून जादा पैशांची मागणी केली जात आहे. कोरोनामुळे सरकारी कार्यालये बंद असल्यामुळे इतर दाखले काढण्यासाठी सुद्धा लोकांची धावपळ होत आहे. या लोकांची गरज पाहून शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी हवेली तहसीलदार सुनिल कोळी यांची भेट घेऊन खडकवासला मतदार संघात मराठा जातीचे दाखले देण्यासाठी मेळावे घ्यावेत अशी मागणी केली. या प्रसंगी विधानसभा प्रमुख नितीन वाघ, उपतालुका प्रमुख संतोष शेलार, विभागप्रमुख रामदास गायकवाड, युवासेना जिल्हा समन्वयक सुशांत खिरीड, तेजस पायगुडे व मंगेश माळी हे उपस्थित होते.