अखेर, ठाणेदार संजय शिरभाते सह पोउनि/राऊत विरुद्ध गुन्हे दाखल, गुन्हेगाराला पाठिशी घालणे भोवले,मारेगाव येथिल घटना

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या नरसाळा येथिल एका अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला पाठिशी घालणारे मारेगाव पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार संजय शिरभाते सह पोउनि/ विरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी उशिरा मारेगाव पो.स्टे.मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत मार्च २०१७ मध्ये नरसाळा येथिल एका गिट्टी खदान मध्ये काम करणार्या मजुराच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला होता. मात्र तत्कालीन ठाणेदार संजय शिरभाते यांनी त्या पिडीताची तक्रार न घेता आरोपिला अभय देण्याचे काम केले. त्यामुळे मारेगाव येथिल काहि सामाजिक संघटनांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना या घटनेची माहिती देवुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पोलीस नाईक इकबाल शेख यांनी आरोपीला ताब्यात घेवुन पिडीताची वैद्यकीय तपासणी करुन आरोपी विरुद्ध भादंवी कलम ३७६,पोस्को तसेच अँट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करुन तपास केला असता यामध्ये आरोपिने केलेले गैरक्रुत्य पहाता तसेच ठाणेदार संजय शिरभाते व पोउनि/ राउत यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करुन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करुन प्रकरण पांढरकवडा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. न्यायालयाने फेर तपासणी करिता वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचेकडे प्रकरण सोपविले.फेरतपासणी दरम्यान पिडित अल्पवयीन मुलीचे नातेवाईक व संबंधित असलेल्या व्यक्तीचे बयान नोंद केले.यामध्ये पोलीस निरिक्षक संजय शिरभाते व पो.उपनिरिक्षकअरुण राऊत दोषि आढळल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात भादंवी कलम १६६(अ),१६७,२०१,२२१पोस्को,सह कलम ४ अँट्रासिटी अँक्ट सह १४५ मपोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.