कुरखेडा येथील तान्हा पोळ्यावर कोरोनाचे सावट शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक तान्हा पोळा रद्द

143

कुरखेडा /राकेश चव्हाण प्र

नगरात हनुमान मंदिराच्या प्रांगणात दरवर्षी काळे परिवारातर्फे सार्वजनिक तान्हा पोळा बाल गोपालांचे उपस्थितीत भरविण्यात येत असतो परंतु सध्या संपूर्ण देशात covid-19 या महामारीचा संसर्ग होऊ नये या कारणास्तव शासनाने सार्वजनिक सोहळे साजरे करण्यास प्रतिबंध केलेला आहे त्यामुळे हनुमान मंदिरात सामाजिक एकात्मता राखत काळे परिवारातर्फे दरवर्षी भरविण्यात येणारा बालगोपाल यांच्या उपस्थितीतला सार्वजनीक तान्हा पोळा चे आयोजन रद्द करण्यात आले आहे. असे आयोजक आशिष काळे यांनी कळविले आहे