न.प. कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

105

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

महाराष्ट्र शासनाचे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे व नगरपालिका प्रशासन संचालनालयाच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद/ नगरपंचायत संवर्ग कर्मचारी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे नाईलाजास्तव १७ ऑगस्ट रोजी एक दिवस काम बंद आंदोलन महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.
राज्यातील नगरपरिषद नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन बाबतचे प्रश्न, नव्याने निर्मित नगर परिषद नगर पंचायती मध्ये कर्मचारी समावेशन, नगरपरिषदेतील सफाई कामगारांचे विविध प्रश्न बाबत, नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे पदोन्नती बाबत, नागरिकांना सेवा देण्याकरिता लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेला आकृतीबंधात सुधारणा करणे, कोरणा विषाणूचा सामना करताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान मंजूर करणे, कर्मचाऱ्यांना जुनी पेंन्शन योजना पूर्ववत करणे इत्यादी मागण्यांबाबत संघटनेने माननीय मुख्यमंत्री महोदय, नगर विकास मंत्री, माननीय प्रधान सचिव, माननीय आयुक्त तथा संचालक यांच्या स्तरावर संघटना प्रतिनिधी समक्ष बैठका झालेल्या आहेत परंतु आश्वासनानुसार कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही. आयुक्त तथा संचालक यांचे कार्यालयात तर माहिती मागवण्यात दोन दोन वर्षाचा कालावधी गेलेला आहे. या गलथान कारभार आकडे लक्ष्यवेधण्या करिता संघटनेने अनेक निवेदने दिली परंतु त्याचा कोणताही उपयोग न झाल्यामुळे कर्मचारी संघर्ष समितीने दिनांक १७ ऑगस्ट रोजी एक दिवस काम बंद करून प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यात आले. यावेळी अकोट नगर परिषद नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, नगरसेवक विवेक बोचे, मंगेश चिखले, शिवदास तेलगोटे, अॅड. योगेश पुराडपाध्ये, मंगेश लोणकर समाजसेवक जितुकुमार जेस्वाणी, मो.आरीफ मो.मारूफ यांनी काम बंद आंदोलनास भेट दिली.
संघर्ष समितीच्या वतीने राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे उपाध्यक्ष धर्माजी खिल्लारे राज्य उपाध्यक्ष दिपक रोडे, राज्य सचिव गजानन इंगळे, सरचिटणीस रामेश्वर वाघमारे, राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, प्रदेशाध्यक्ष जयसिंग कछवाल, कार्याध्यक्ष अनुप खरारे, महामंत्री दिलीप अण्णा चांगरे, पी.बी. भातकुले, चंद्रकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष शांताराम निंधाने, प्रदेश उपाध्यक्ष श्याम पीवाल तेल्हारा, मदन खोडे पातूर , मनोज चावरिया बाळापुर, राजा सारवान, राजू शेठ मुर्तीजापुर, प्रवीण चंडालिया अकोट, राधेश्याम मर्दाने, लक्ष्मीनारायण महातो अकोट, तसेच महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रावणकर, उपाध्यक्ष प्रवीण शर्मा, रमेश गिरी, सचिव दीपक सुरवाडे, संघटना अध्यक्ष अकोट ईश्वर पवार, तेल्हारा भरत मलीये, बाळापुर नागोराव सुरजुसे, मुर्तीजापुर हाफिस खा, पातुर नबीखान बार्शीटाकळी रुपेश पिंजरकर यांचे नेतृत्वात सर्व नगरपरिषद कर्मचारी आंदोलनात सहभागी १००% टक्के काम बंद आंदोलन यशस्वी करण्यात आले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील नगरपरिषद अधिकारी कर्मचारी सफाई कामगार सहभागी झाले होते.