नरसाळा येथील अवैध दारुविक्री तात्काळ बंद करा, महिलांचे पोलिस स्टेशनला निवेदण

 

तालुका प्रतिनिधी / मारेगांव…..
श्रीधर सिडाम

नरसाळा येथील अवैध दारु व्यवसाय तात्काळ बंद करुन दारु विक्रेत्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावि यासाठी नरसाळा येथील महिलांकडुन पोलिस स्टेशन मारेगांव येथे ता.१७ ऑगस्ट सोमवारला निवेदण देण्यात आले.
मारेगांव तालुक्यातील नरसाळा येथे मागील अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्रीचा व्यवसाय सुरु आहे.गावातील शांतता व सामाजिक स्वास्थ्य अबाधित रहावे या हेतुने ग्रामस्थ महिला पुरुषानी त्याला वारंवार सुचना व समज सुध्दा दिली .परंतु सदर दारुविक्रेत्यांकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.
सदर दारुविक्रेते हे कोणालाही न जुमानता अवैध दारु व्यवसाय जोरात करत असुन यामुळे गावातील शांतता,सुव्यवस्था,व सामाजिक स्वास्थ्य बिघडु नये, यासाठी महिलांनी पुढाकार घेवुन मारेगांव पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे.
यावेळी शारदा पांडे, कमल येरचे, वनिता परचाके, मंगला गोवारकर, मंगला मेश्राम, निर्मला वुईके, सरला तोडासे, बेबी गोवारकर, दुर्गा चिकराम, यांचेसह अनेक महीला उपस्थित होत्या.