नरसाळा येथील अवैद्य दारू बंद करण्यासाठी महिला सरसावल्या: मारेगाव पोलीस निरिक्षकाला निवेदन सादर

106

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव: मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे अवैद्य दारूचा महापूर आल्याने सामान्याचे संसार उद्वस्त होत असल्याने ह्या अवैद्य दारु विकणाऱ्याचा बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा नरसाळा येथील महिलानी निवेदनातून मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक जगदिश मंडलवार यांना दिला आहे.
गेल्या पाच महिन्यापासून कोरोना वायरसच्या निर्मुलनासाठी शासनाने लॉक डाऊन केल्या मुळे सामान्य कुटूंबाचे आर्थिक कंबरडे मोडले त्यात तालुक्यातील नरसाळा येथे अवैद्य दारु विक्री खुलेआम होत असल्याने अनेकाचे संसार उघड्यावर पडत आहे , सोबतच या अवैद्य दारू विक्रीमुळे कुटूंबात तंट्याच प्रमाण वाढले आहे, ही होत असलेली अवैद्य दारू विक्री कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे, या प्रकारामुळे गावातील शांतता भंग होत असल्याने नरसाळा येथील महिला वर्ग संतप्त झाल्या असून ही अवैद्य दारु विक्रीला तातडीने पायबंद घाला अन्यथा नरसाळा येथील महिला वर्ग या विरोधात उतरल्या असून दि .१७ ऑगष्टला मारेगावचे पोलीस निरिक्षक जगदिश मंडलवार यांना निवेदन सादर केले. त्यावेळी शारदाताई पांडे,बकुबाई मडावी,शालु भुसारी, वृंदा केराम, मंजुळा ठाकरे, मनिषा चिकराम,कोंडूताई किनाके, संगिता कडूकर,प्रभा नेहारे, लता भुसारी,तुळसा कुळसंगे, वनिता परचाके,बेबी गोवारकर,कमल येरचे,गुंफा गोवारकर, निर्मला उईके, दुर्गा चिकराम,गिता खंडरे,सरला तोडासे, मंगला उईके, सुवर्णा उईके व गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.