आमगाव येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण.. नगरपरिषद प्रशासक डी.एस.भोयर याच्या हस्ते ध्वजारोहण..

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..

आमगाव, ता.18: आमगाव शहरात भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. येथील विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात संस्था सचिव बबनसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डी.एस.टेंभुर्णे,प्रा.आर.डी.नाईक,प्रा.जी.एस.लोथे व प्राध्यापक उपस्थित होते. डाॅ.आंबेडकर चौकात ज्येष्ठ नागरिक बबनसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष राजभूषण मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर, कालकाप्रसाद साहू, समितीचे सचिव जनार्धन शिंगाडे. समितीचे उपाध्यक्ष प्राचार्य डी.एस.टेंभुर्णे,माजी पंचायत समिती सदस्य छबूताई उके,तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय बहेकार, पोलिस पाटील नर्मदा चुटे, सेवानिवृत मुख्याध्यापक शिवचरण शिंगाडे ,रविंद्र मेश्राम ,गुड्डा गहरवार ,प्राचार्य अनिल मुरकुटे,अमृतलाल चतुर्वेदी,भरत वाघमारे, योगेश रामटेके, संपत सोनी,महेश उके, के.डी.चोरडीया उपस्थित होते.
तहसिल कार्यालयात तहसिलदार डी.एस.भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी चंद्रकांत साबळे प्रामुख्याने उपस्थित होते.पोलिस स्टेशन येथे उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण,सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे प्रामुख्याने उपस्थित होते.