टायगर ग्रुप आलापली या व्हॉटसअँप ग्रुप च्या माध्यमातून १५०० च्या वर गरजूंना पोहचविले रक्त – आलापली येथील तीन युवकांचा पुढाकार

0
110

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम :- रक्तदानाअभावी कुणाचाही जीव जावु नये,या तळमळीने ग्रामीण अतिदुर्गम भागातील गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील साई तुलसिगीरी , दौलत रामटेके आणि अहेरी येथील विकी तोडसाम या तीन युवकांच्या संकल्पनेतून “टायगर ग्रुप रक्ताचे नाते “या नावाने व्हाॅटसॲप ग्रुप तयार केला.
रक्ताची निकड भागविण्यासाठी अहेरी,आलापल्ली याठिकाणी आता पर्यंत ८ ब्लड कॅम्प घेण्यात आले व गरजुना या ग्रुप वर संदेश पाठवल्यास एका कॉलवर रूग्णाला मोफत रक्त पुरवठा केला जातो.या उपक्रमामुळे आतापर्यंत १५००च्या वर गरजू रुगणांना जीवनदान मिळाले आहे.

पैशांने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची निर्मिती कदापि करता येणार नाही.विशिष्ट गटाच रक्त हव असल्यास पैसे असुनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मीळत नाही.गरिबांचे तर हाल होतात.वेळीच रक्त न मिळाल्याने रुग्णांना जीव गमावण्याची वेळ येत आहे.ही अनेक रूग्णालयातील वस्तुस्थिती आहे.
याचा अभ्यास करून गरीब, गरजू, सामान्य रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त निःशुल्क उपलब्ध व्हावे यासाठी तेलंगाणा मधेल हैदराबाद, मांचेरीयल,चेंनुर,छत्तीसगढ मधील रायपूर,बिजापूर,
महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर,वर्धा, गडचिरोली,या जिल्ह्यातील रूग्णांना वेळीच रक्त निःशुल्क उपलब्ध करून देण्यासाठी धावपळ करावी लागते.समस्त महाराष्ट्रातील जागरूक युवकांना एकत्रित करून कोणत्याही जिल्ह्यातील आलेल्या रूग्णाला सहजपणे रक्त पुरवठा केला जातो.
साई तुलसिगारी ने हा ग्रुप ४ जून २०१८ रोजी टायगर ग्रुप रक्ताचे नाते हा समाजउपयोगी व्हाॅटसॲप ग्रुप तयार केला.आधी त्या ग्रुप मध्ये २५ लोक होते.आज ९००डोनर ची नोंदणी आहे.टायगर ग्रुप रक्ताचे नाते या रक्त सेवेला २ वर्ष पूर्ण झाले आहेत.
या माध्यमातून महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरील ६०० च्या वर रक्त गरजूना रक्त पुरविले आहेत.
आतापर्यंत शेकडो रक्त गरजूंना रक्त पुरवून रुग्णाचे जीव वाचवण्यात या टायगर ग्रुप ला यश आले आहे.
या ग्रुप च्या माध्यमातून अनेक रक्त दाते जुळले आहेत. प्रत्येक सदस्यांचे ध्येयानुसार योगदान दिले जाते.

“रक्त गरजूंच्या सेवेसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे”

हा टायगर ग्रुप चे ब्रीद वाक्य आहे.