महादुला नगरपंचायत चा भोंगळ कारभार ; नगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती यांचे दुर्लक्ष हजारो लीटर पिण्याचे पाणी दोन दिवसापासून वाहात आहे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निष्क्रीय जनप्रतिनिधी यांचे कान टोचावे

181

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी / नागपुर : १८ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत येथे सध्या भोंगळ व गचाळ कारभार सुरू आहे. याकडे सर्वाचे ही दुर्लक्ष सुरु आहे. मागील ४ दिवसांपासुन सिद्धार्थ नगर महादुला वार्ड क्रमांक ९ मध्ये पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन फुटली असुन हे दुरुस्ती चे काम अनुभवी प्लंबर कडुन न करता अनुभवहीन लोकांकडून करुन घेत आहेत? मागील ४ दिवसापासून ही पाईपलाईन दुरुस्ती होत नसुन मागील २-३ दिवसापासून दररोज सकाळी ७ ते ८ या वेळात नळ सोडले जातात. त्यामुळे या फुटलेल्या पाईपलाईन मधुन हजारो लीटर पिण्याचे पाणी रस्त्याने वाहुन जात आहे.
नगराध्यक्ष, मुख्याधिकारी पाणीपुरवठा सभापती व नगरसेवक यांचे याकडे कोणतेच लक्ष नाही. एक पाईपलाईन लिकेज दुरुस्ती करायला ४ दिवस का लागतात. नगराध्यक्ष याच्या जवळच्या परंपरागत ठेकेदाराला हे पाईपलाईन दुरुस्ती चे काम दिले त्याने दुसऱ्या लेबर ला खोदायचे काम दिले. पण ते लेबर दुपारी २ वाजता खोदाईला भिडतात संध्याकाळी ६ वाजता काम बंद करतात. हे असे किती दिवस खोदाई सुरु राहणार? आणि केव्हा ही पाईपलाईन दुरुस्त होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जर पाईपलाईन दुरुस्त लवकर होत नसेल तर दररोज नळ सोडुन हजारो लीटर पाण्याची बर्बादी महादुला नगरपंचायत का करीत आहेत. लोकांना एक गुंड पिण्याचे स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही गढुळ व घाण पाणी लोक पिणार काय? भर पावसाळ्यात जर असे हजारो लीटर पिण्याचे पाणी व्यर्थ वाया घालवतील तर उन्हाळ्यात पाणी टंचाई होईल. एकीकडे पाणी बचाव म्हणायचे व दुसरीकडे पाण्याची बर्बादी याकडे जर नगरपंचायत महादुला दुर्लक्ष करीत असेल तर या क्षेत्राचे माजी ऊर्जामंत्री तथा नागपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेळीच या भोंगळ कारभाराकडे लक्ष घालुन निष्क्रीय जनप्रतिनिधी यांचे कान टोचावे अशी सुज्ञ नागरिकांनी मागणी केली आहे.