जीडीसीसी बँक मुंडीकोटा सोमवारपासून पूर्ववत

120

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे

तिरोडा : मुंडीकोटा येथील जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक येथिल एक कर्मचारी कोविड-१९ ने प्रभावित झाले असल्याने बँकेचे सर्व व्यवहार पुढील अदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित झाले होते.
सदर बँक शेतकऱ्यांची बँक असल्याने पीक कर्ज वाटप, पीक विमा, ग्राहकांचे रक्कम अदा करण्यासाठी मुख्यालय गोंदिया येथील पर्यायी कर्मचारी पाठवून शाखा सुरू करण्याची परवानगी मागितले होते.
शेतकरी व ग्राहकांचे हित जोपासण्याचे हिताने दि गोंदिया डिस्ट्रिक्ट को ऑफ बँक ली.गोंदिया यांचे अंतर्गत कार्यरत असलेली मुंडीकोटा येथील बँकेची शाखा सेनेटाईजर करण्याचे अटींवर अधीन राहून मुख्यालय गोंदिया येथील पर्यायी कर्मचारी पाठवून बँक सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बँकेचे जिल्हा व्यस्थापक, मुंडीकोटा येथील शेतकरी, ग्राहक यांनी जिल्हा आपत्ती व्यस्थापनाचे आभार व्यक्त केले आहे.
शेतकरी, ग्राहक बँकेत आपले खात्यातील रक्कम वाटविण्यास आले असता बँकेतील कानिष्ठ कर्मचारी शिपाई व गार्ड यांनी बँक आज बंद असल्याचे सांगितल्याने ग्राहक व शेतकऱ्यांनी आल्या पावले परत जावे लागत आहे. आज मोहबैल आहे. उद्याला बैलांचा पोळा असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.