जय रामटेके
तालुका/प्रतिनिधी
नागभीड दि 17 ऑगस्ट
आज सायंकाळी घराकडे परत जात असतांना नाल्याच्या पुलावर खून झाल्याची धक्कादायक बातमी.
सविस्तर वृत्त असे की, गुरुदेव चौधरी हे रेल्वे मध्ये कार्यरत आहेत ते काम आटोपून आपल्या स्वगावी मांगली ला बामणी वरून जात असतांना एक नाला पडतो त्या नाल्यावर आज सायंकाळी सात वाजताचे सुमारास खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली .प्रत्यक्ष घटना स्थळी पोलीस पोहचले असून शव नागभीड ग्रामीण रुग्णालयात हलविले आहे. बातमी लिहत पर्यन्त खून कसा झाला किंवा खुनाचे कारण कळू शकले नाही. मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असल्याने अनेक शंका कुशंकाना पेव फुटले आहे.