वाई येथील पत्रकार रामेश्वर उबाळे यांना वाई शिवारा लगत गाडी थांबवून जिवे मारण्याच्या धमक्या

113

 

प्रतिनिधी – सुदर्शन राऊत जालना

दिनांक 27 7 2020 रोजी दीपक घाडगे याने माझ्यावर विनयभंगाचा खोटागुन्हा परतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात जे साक्षीदार होते त्यांनी परतूर पोलीस स्टेशन येथे जाऊन सत्य परिस्थिती काय?या प्रकरणात पीआय हुबे साहेब .यांना सविस्तर माहिती सांगितली असता तेथे यांचे जवाब लिहून घेतले होते.तसेच दैनिक आत्ताच एक्सप्रेस चे काम करून आमची उपजीविका भागवतो आहे आज दिनांक 15/ 8/ 2020 रोजी मी जालना येथून माझे काम आटपून संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास वाई शिवारात कॅनॉल जवळ माझी गाडी क्रमांक एम एच 20 डि जे 1706 उभी करून बसलेलो असताना.
इसम नामे दीपक पांडुरंग घाडगे रा वाई हा त्याची मोटरसायकल वर आला व माझ्या गाडीसमोर मोटर सायकल उभी करून मागील विनयभंगाचे गुन्ह्यातील साक्षीदार पोलिस स्टेशन परतुर येथे जवाब देण्यासाठी माझ्याविरोधात कां नेले या कारणावरून शिवीगाळ करून माझे गाडीचा दरवाजा उघडून माझा गळा धरून मला ओढू लागला व माझे ओळखीचा गैरफायदा घेऊन माझ्या उजव्या हाताच्या बोटातील सोन्याची 4gram ची अंगठी काढून घेतली मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या सदर घटना ही काही लोकांनी बघितली, तेवढ्यातच हातातील अंगठी घेऊन तो तेथून पसार झाला त्यांच्याविरुद्ध मी परतूर पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम 327, 323 504 506 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल. पुढील तपास शशिकांत पवार हे करत आहेत.