Home Breaking News प्रा.आ.केंद्रातील एमबीबीएस,बीएएमएस डॉ बनलेत हुकमाधिकारी शासनपरिपत्रका विना नोकरीवरून काढून घेण्याचे निर्देशानुसार बजावावी...

प्रा.आ.केंद्रातील एमबीबीएस,बीएएमएस डॉ बनलेत हुकमाधिकारी शासनपरिपत्रका विना नोकरीवरून काढून घेण्याचे निर्देशानुसार बजावावी लागते आरोग्य सेवकांना नियमबाह्य कर्तव्य चेकपोष्ट,कंटेन्मेंट झोन,कोविड केअर केंद्र इतरत्र कर्तव्य बजावणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांचे अनेक समस्यांचे वरिष्ठांना निवेदन

193

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे

तिरोडा : प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्वतःची कर्तव्य स्वतः न बजावता हुकमाधिकारी बनून इतर आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांकडून नोकरीवरून काढून घेण्याच्या धाक, दरारा, वचक, तंबी ने प्राथमिक आरोग्य अधिकारी हे आपले अधिनस्त कर्मचारी यांचेकडून दिवस रात्र सेवेचा आदेश लावून स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचे धक्का दायक बाब उघडकीस आरोग्य सेवकांनी आणली आहे. अशी नियम बाह्य सेवा आरोग्य सेवक कर्मचारी देत असले तरी त्यांचेकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोग्य कर्मचारी यांनी धक्कादायक बाब समोर आणली आहे.

उपकेंद्र स्तरांवरील दैनंदिन कामाव्यतिरिक्त चेक पोस्ट, कंटेन्मेंट झोन, अलगीकरण कक्ष, रेल्वे स्टेशन यासारख्या इतर ठिकाणी दिशा-निर्देशाप्रमाणे सेवा देत आहेत. मात्र याचा आरोग्य सेवक कर्मचारी वर्गाची दैना समजून घेण्यास आरोग्य अधिका-यांचे लक्ष जाईना असे चित्र आहे. आरोग्यासी संबंधीत सेवा देण्याचे कार्य एमबीबीएस, बीएएमएस यांचे कार्य असले तरी अशी महत्वपूर्ण कार्य आरोग्य सेवकांकडून पूर्ण केली जात असल्याचा प्रकार सूरु आहे.

उपकेंद्र स्तरावरील आरोगयसेवकांची या पावसाळ्यात गृहभेटी, किटकशास्त्रीय सर्वेक्षण, तापाचे रुग्ण शोधणे, हत्तीरोग शोध मोहीम, क्षयरुग्ण शोध मोहीम, कुष्ठरोग शोधमोहीम, ओ.टी. परीक्षण, पाणी नमुने गोळा करणे, लसीकरण सत्रामध्ये सहभाग, पिबीएस व असांसर्गिक आजार रुग्ण शोध व मुख्यतः स्थलांतरीत प्रवाशांची माहिती संकलन, सर्वेक्षण, पाठपुरावा व औषधोपचार पुरविणे अशी कामे दैनंदिन कामे आरोग्य सेवकांची आहेत. तर प्रा.आ.केंद्रातील एमबीबीएस, बीएएमएस यांची जबाबदारी आरोग्याची तपासणी असे असून आरोग्य तपासणीची कामे आरोग्य सेवकांकडून चेकपोष्ट, कंटेन्मेंट झोन, कोविड केअर केंद्राद्वारे केली जात आहे.

चेकपोस्ट, कंटेन्मेंट झोन, कोविड केअर केंद्र व इतर ठिकाणी दिवस-रात्र पाळीत ऊन, पाऊस, वादळ-वारा यासारख्या अनेक समस्यांचा सामना करीत आपले चोख कर्तव्य बजावीत आहेत.

चेक पोस्टवर, कोविड केअर केंद्रात आरोग्य सेवा पुरविणे हे आरोग्य अधिकारी यांचे अखत्यारीतील कार्य आहे. हल्ली जवळपास प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य अधिकारी यांची नेमणूक हंगामी स्वरूपाची का होई ना झालेली आहे. असे असतांना आरोग्य सेवकांना चेकपोस्टवर लावले जात असल्याने आरोग्यसेवकांचे दैनंदिन कार्य प्रभावित केले जात आहे. यामुळे कोविड विषाणूचा प्रादुर्भाव होताच अन्य आजार हद्दपार झालीत का ? असा यक्ष प्रश्नही आरोग्य सेवकांनी निर्माण केला आहे.

काही ठिकाणी साप, विंचू व इतर सरपटणारे प्राणी आढळतात तसेच रस्त्यावर व उघड्यावर रात्र-पाळीत कर्तव्य बजावीत असतांना किटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये काही आरोग्य कर्मचारी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या असांसर्गिक आजाराने ग्रस्त आहेत. सध्या कोविडचा प्रकोप सुरू असल्याने अपर्याप्त साधन सामग्रीमुळे त्यांनाच लागण होण्याची भीती कर्मचाऱ्यांना झालेली आहे.

उल्लेखनीय असे की, आतापर्यंत शासनाने घोषीत केलेल्या विम्याचे फॉर्म सुद्धा भरण्यात आलेले नसल्याचे धक्कादायक बाब समोर येत आहे.
अतिरिक्त कार्यभार व तासांचे इतर विभागासारखे वेतन व भत्ता सुद्धा मिळत नसल्याने आरोग्यसेवकावर अतिरिक्त आर्थिक व मानसीक ताण पडत आहे. चेकपोस्टवर सेनेटाईजर व गलब्जची सुविधा नाही.

मागील चार महिन्यापासून दिवस-रात्र पाळीत कर्तव्य बजावतांना सुटीचे दिवस व रविवारला सुद्धा ड्युटी करावी लागते आहे. त्यामुळे बदली रजे ऐवजी दैनंदिन कामे आड येतात. याचा अतिरिक्त मोबदला सुद्धा मिळत नाही. या सर्व कामाच्या बाबींमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष झालेले आहे.

आरोग्य विभागाद्वारे मुल्यमापन करीत असताना कामाच्या अपुऱ्या कार्यपद्धतीने निष्ठावाण, कर्तव्यदक्ष आरोग्यसेवकांवरच कामचुकारपणा व बेजाबाबदारीचे ठपके लावण्यात येत असल्याचे धक्कादायक बाब बोलली जात आहे. आरोग्य सेवकांच्या समश्यां मार्गी लावण्याची मागणी आरोग्य सेवकांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

याकडे तालुका आरोग्य अधिकारी नियंत्रक पथक तिरोडा व जिल्हा आरोग्य अधिकारी हे *हुकमाधिकारी बनलेले* प्रा.आ.केंद्राचे एमबीबीएस, बीएएमएस वैद्यकीय अधिकारी यांचेवर कोणती कारवाई करतात. आरोग्य सेवकांची समस्यांचे उपाययोजना कशी करतात. जिल्हा आरोग्य प्रशासन जातीने कोणती भूमिका बजावतात. याकडे आरोग्य सेवकांचे लक्ष लागले आहे.

Previous articleशेतीच्या वादातून रुग्णालयात भर्ती महिलेची तक्रार घेण्यास पोलिसांनी दिला नकार रुग्णालयात भर्ती महिलेचे बायन,जबाब नोंद करण्यास पोलिसांचा कर्तव्यकुचराई
Next articleवाई येथील पत्रकार रामेश्वर उबाळे यांना वाई शिवारा लगत गाडी थांबवून जिवे मारण्याच्या धमक्या