विदर्भ राज्य आंदोलन समिति, वंचित बहूजन‌ आघाडी व आम आदमी पार्टी तर्फे सिंदेवाही विद्युत कार्यालयासमोर ‌केली विज बिलांची होळी.

105

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत पोपटे,
नागपूर विभागीय प्रतिनिधी,
दखल न्युज व दखल न्युज भारत.

विज वितरण कंपनीने लॉकडाऊन चे काळात तिन महिन्यांचे एकत्रितपणे विजबिल दिल्याने सामान्य विज ग्राहकांचे कंबरडे मोडले गेले. त्यानंतर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात त्याबाबत ओरड होत असून, एकत्रीत दिलेले तिन महिन्यांचे विजबिल सरसकट माफ करा. या मागणीला घेऊन, विदर्भ राज्य संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी, आणि आम आदमी पार्टी तर्फे विजवितरण कंपनी चे सिंदेवाही उपविभागीय कार्यालयासमोर दिनांक १७/८/२०२० रोजी दुपारी १-३० वाजता विजबिलांची होळी करण्यात आली. याचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार श्री. वामनराव चटप आणि माजी राज्यमंत्री तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. रमेशकुमार गजभे यानी केले आहे. सोबत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. विजबिलाची होळी करतांना त्यासंबंधी घोषणा देण्यात आल्या.
*मागण्या*
१) लॉकडाऊनचे काळातील
दि. २४/३/२०२० पासुनचे तीन महिन्यांचे विजबिल माफ करण्यात यावे. व ग्राहकांना देण्यात आलेली सर्व विज बिले वापस घेण्यात यावे.
२) यापुढे २०० युनिट पर्यंत
विज मोफत देण्यात यावी
३) विजेच्या एका युनिटचा उत्पादन खर्च २-५० रुपये असतांना घरगुती ग्राहकांना ७-५० रुपये सरासरी घेतले जातात व कमर्शियल चे औद्योगिक वापराकरीता ११-५० रुपये विजबिल चार्ज केले जाते. म्हणून विजेचे स र्व ग्राहकांचे विजबिल निम्मे करण्यात यावे.
४) विदर्भातील ११ ही जिल्ह्यात व १२० तालुक्यात गेल्या ३ वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीपंपाचे सर्व थकीत विजबिल माफ करण्यात यावे.
५) शेतकऱ्यांना पुर्णवेळ पुर्णदाबाची विज देण्यात यावी व मागेल त्याला तात्काळ विज कनेक्शन देण्यात यावे. विदर्भ उष्ण, नक्षलग्रस्त व सर्वात जास्त विज उत्पादन करणारा प्रदेश असल्यामुळे विदर्भातील १२० तालुक्यातील भारनियमन कायमचे संपविण्यात यावे.
अशा मागण्यांचे निवेदन मा. ना. डॉ. नितीन राऊत, उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपकार्यकारी अभियंता श्री. सतिश के. गजभिये, विजवितरण कंपनी, उपविभाग- सिंदेवाही यांचे मार्फत देण्यात आले. निवेदन देतांना सर्वश्री माजी आमदार श्री. वामनराव चटप, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, अशोक साळवे, गंगाधर श्रीरामे, विनायक गजभिये, नत्थु मडावी, मनोहर पवार, बाबुराव परसावार, वंदना गजभिये, इंदिरा पवार, सतीश पवार, भाष्कर ठाकरे, सेशराव मडकाम, विजय बह्याळ, अरविंद गुरनूले, संजीव चौके, अमर कोडापे, चोखोबा वाघमारे, प्रज्वल चौधरी,‌ गोपाल चौके आणि पत्रकार तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य भगवंत पोपटे,सिंदेवाही हे प्रामुख्याने उपस्थित होते.