महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी चे आजी व माजी विद्यार्थि लॉकडाऊनच्या काळात गावात देत आहेत ज्ञानाचे धडे… मागिल महीन्यापासुन शाळा बंद शिक्षण सुरु उपक्रम कोंढाळा येथे सुरु…

149

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

कोंढाळा :-
कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्यात आला.पण ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था खुप खराब आहे.कारण आई-वडील मोलमजुरी करण्यासाठी शेतात काम करत असतात.
विद्यार्थी पानटपरी वर बसून खर्रा घोटताना , पत्ते खेळताना पाहवयास मिळत आहेत.यामुळे विद्यार्थी वाईट व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता आहे.
शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देण्याचे आदेश केले.पण ग्रामिण भागात इंटरनेट मोबाईल फोन आणायचा तरी कुठून असा प्रश्न पाल्यांना पडत आहे.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यीं रस्त्यावर फिरताना दिसत आहे.
त्यामुळे पाल्यांची सुध्दा चिंता वाढली आहे.जिल्हा परिषद शाळा बंद असल्याने ग्रामिण भागात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विषयाकडे दुर्लक्ष होत आहे.पाल्यांना सुध्दा घरी शीक्षणाचे धडे देण्यासाठी वेळ नाही. पाल्यं आपल्या कामासाठी बाहेर जावे लागते.त्यामुळे पाल्यांचे सुध्दा मुलांनवर लक्ष देणं शक्य होत नाही आहे. विद्यार्थी कल आता वाईट व्यसनाकडे जाऊ नये त्याना ज्ञानाचे धडे मीळत राहावे म्हणून आम्ही सर्व मीत्रमैत्रीणी मीळूून मंदीर,,समाजमंदीर, बुद्ध , विहार ,वाचनालय व गावातील अनेक ठीकानी ज्ञानाचे धडे देण्याच उपक्रम मागिल महीन्यापासुन सुरु केला आहे
यामध्ये -प्रियंका ठाकरे,
शर्मिला झीलपे
शिवानी सेलोटे
नितेश पाटिल
आक्रोश शेंडे
अमित डोनाडकर
गिरीश भजनकर
सुरज चौधरी
विद्यार्थि महात्मा गांधी महाविद्यालय आरमोरी चे NSS चे आजी व माजी विद्यार्थि यांचे विशेष सहकार्य लाभले.